नमस्कार मंडळी आज आपण एका बहुगुणी फळ झाडाची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, अननस प्लांट 

हे एक बहुवर्षायू लहान झुडूप आहे.या फळाचे उगमस्थान आहे ब्राझील!! याची लागवड भारत, मलेशिया, आस्ट्रेलिया,फिलिपीन्स, आफ्रिका इत्यादी देशात केली जाते.हे एक कंदवर्गीय स्वादिष्ट आंबट गोड ऊष्ण प्रदेशातील पौष्टिकफळ आहे. आकाराने गोल, उभट  फळ दिसायलाही आकर्षक असते.हे झाड आपल्या बागेचे आकर्षण असते असे म्हंटलं तर वावगे होणार नाही! बाजारातून आणलेल्या अननसाचा शेंडा कापून कुंडीत किंवा जमिनीत लाऊ शक्यता किंवा पाण्यात बुडवून ठेवा व मुळे फुटल्यानंतर लावा.साधारणपणे एक दीड वर्षांनंतर फळ धरते. फळ धरल्यापासून फळ पिकायला 3 ते 4 महिने लागतात. संयम हवा. या झुडपाच्या बाजूने फुटवे येतात तेही लाऊ शकता.

गुणधर्म:- अननसात ‘क’ जीवनसत्त्व हे भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर अननसामध्ये सायट्रिक आम्ल व मॅलिक आम्ल असते. ही दोन्ही आम्ले शरीरास पोषक असतात. ही आम्ले शरीरात शोषली जाऊन उष्णता व ऊर्जा निर्माण करतात. अननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते. अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचे एन्झाइम असते. ते शरीराचा दाह आणि सूज कमी करते आणि घेतलेल्या अन्नाचे पचन करण्यास मदत करते. पिकलेला अननस मधुर आंबट, मूत्रल व पित्तशामक असतो. यामुळे उष्णतेचे विकार  कमी होण्यास मदत होते.

प्रथिनयुक्त आहाराचे पचन होण्यासाठी अननसाचा उपयोग होतो. म्हणून प्रथिनयुक्त भोजनाच्या शेवटी अननस खाणे श्रेयस्कर असते. अननसामुळे उदरव्याधी, कावीळ, प्लीहावृद्धी, पित्तव्याधी, पांडुरोग  यांसारखे रोग बरे होण्यास मदत होते. सर्व लहान थोर मंडळींसाठी हे एक उत्कृष्ट फळ आहे. जेव्हा पोटात कृमी-जंत होतात. तेव्हा अननस खाणे उत्तम असते. अननस हे फळ कृमिनाशक आहे. पोटात दुखत असेल तर अननसाच्या सेवनाने पोटदुखी कमी होण्यास मदत होते.पित्तप्रकृतीच्या व्यक्तीसाठी अननस अत्यंत उपयुक्त आहे.  त्याच्यामधील ब्रोमेलाइम हे एन्झाइम अन्नपचनास मदत करते.

अननसामध्ये ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, ब्रोमोलिन, कॅरोटिन हे घटक असतात. त्यामुळे काही त्वचा रोगांवर अननसाचा रस नियमितपणे सेवन केला असता त्वचारोग बरे होऊ शकतात. अननसापासून मुरंबा,ज्यूस,जेली,जाम सरबत असे पदार्थ बनवून वर्षभर अननसाचा आहारात वापर करता येतो. अननसाच्या पानापासून धागा काढून कापड  बनवले जाते व दोरा तयार केला जातो. अननसामध्ये दडलंय काय:-

फायबर्सकार्बोहायड्रेटसपोटॅशियमकॅल्शियममँगनीजफॉस्फोरसजीवनसत्त्व ‘ क ‘अँटीऑक्सिडंट्ससायट्रिक व मॅलीक आम्लब्रोमेलीन एन्झाइमइत्यादी.तेव्हा सर्व बागप्रेमींनी अश्या बहुगुणी झाडाला  आपल्या बागेत लावायचा प्रयत्न करावा. आपल्या झाडाला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर फळ लागल्याचा आनंद विरळाच असतो!!  या फळाचे पोषणमूल्य लिहिण्याचा एकमेव हेतू होता की आपण हे झाड बागेत लावावे!!!

फोटोतील अननस माझ्या बागेतील नाही!

Interested in submitting a post of your own? Get in touch here.

Explore More

Snippets

2 June 2021 0 Comments 0 tags

Snippets from Sanatan Prabhat newspaper (Goa-Sindhudurg Edition), pages 6 and 7, dated 30th May, 2021.

Mother Earth

5 April 2021 0 Comments 0 tags

Our *Mother Earth* is so *beautiful* and such a *fantastic support system* for all of us. We have to  ensure that as responsible  children , we protect this beauty and